Chinchwad : संगीतकार आनंदजी यांच्या उपस्थितीत रंगला ‘जॉय ऑफ लाईफ’ कार्यक्रम

एमपीसी न्यूज- महेश प्रोफेशनल फोरम आयोजित ‘जॉय ऑफ लाईफ’ कार्यक्रमामध्ये संगीतकार आनंदजी यांच्या उपस्थितीने कार्यक्रमात रंगत आणली. या कार्यक्रमात वृद्धाश्रमातील ज्येष्ठांचा विशेष सन्मान करण्यात आला तसेच गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यात आली.

महेश प्रोफेशनल फोरम ही एक सेवाभावी संस्था असून व्यावसायिक, वकील, डॉक्टर, इंजिनिअर,सीए यांनी या संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून गरजवंताना मदतीचा हात दिला जातो. ‘जॉय ऑफ लाईफ’ आणि ‘गिफ्ट ऑफ एज्युकेशन’ या कार्यक्रमात प्रख्यात संगीतकार आनंदजी यांनी प्रथमच पिंपरी चिंचवड शहरात उपस्थिती लावली होती. चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात हा कार्यक्रम झाला.

कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी गिफ्ट ऑफ एज्युकेशन या ऑर्केस्ट्राचे विशेष आयोजन केले होते. या संगीत कार्यक्रमचा आस्वाद घेण्यासाठी वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असणाऱ्या आनंदजींनी ‘मेरा जीवन कोरा कागज’ हे गाणे प्रेक्षकांसाठी सादर केले. वय वर्ष 87 असणारे आनंदजी या वेळी भावुक झाले आणि ‘इतके आयुष्य मिळाले असताना बरोबरचे सर्व सोडून देवाघरी गेल्यामुळे मी एकटा राहिलो’ असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

HB_POST_END_FTR-A2