BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : चिंचवडच्या भूषण तोष्णीवालला उपराष्ट्रपतीच्या हस्ते ऑल राऊंड अचिव्हमेंटसचा पुरस्कार  

102
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज –  दृष्टीहिनतेवर मात करुन कर्तृत्वाची  वेगळी  छाप सोडणारे पिंपरी-चिंचवडचे भूषण तोष्णीवाल या केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाचा रोल मॉडेल या त्रेणीत राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार उपराष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

भूषण आपली यशोगाथा सांगताना म्हणाला, आयुष्यात आलेल्या अडचणींचा डोंगर पार करत मी सीए कसा झालो, कोणत्या अडचणी आल्या, त्यातून मार्ग काढत न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीत अधिकारी म्हणून नोकरीपर्यंत मजल कशी मारली याची यशोगाथा सांगितली.

भूषण २०११ मध्ये सीए परीक्षा उत्तीर्ण झाला. पण तो बॅलन्सशीटवर सही कशी करणार, असा प्रश्न ऑल इंडिया सीए इन्स्टिट्यूटला पडला. त्याला खास संघटनेसमोर बोलावण्यात आले. तेव्हा कुशाग्र बुद्धिमत्तेच्या भूषणला तज्ज्ञांनी विचारले, आपल्या क्षेत्रात डोळ्याने बघितल्याशिवाय बॅलन्सशीटवर सही करता येत नाही. तू हे काम कसे करणार? त्यावर भूषण म्हणाला, सर्व जग विश्वासावरच चालत आहे. मी विश्वासू सहकारी निर्माण करीन. त्यांच्याकडून हे काम करवून घेईल. मोठे सीए देखील विश्वासू सहकाऱ्यांवर अवलंबून असतात.

जन्मानंतर विसाव्या दिवशी अंधत्व आले

भूषणच्या आलेल्या अंधत्वाबद्दल त्याचे वडील नंदकिशोर म्हणाले,  भूषणची देहबोली एखाद्या सिनेमातील स्टारसारखीच आहे. जन्मानंतर विसाव्या दिवशी अंधत्व आले. त्यामुळे पहिलीपासून अंध शाळेत शिकलो. भूषणला त्याच्या वडिलांनी अंध शाळेतून काढून सामान्य मुलांच्या शाळेत घातले. तेव्हा तो बाजूला बसणाऱ्या मुलांना विचारून अभ्यास करू लागला. दहावीत ८७ टक्के गुण मिळाल्यावर सीए होण्याचे ध्येय ठेवले.भूषणने शास्त्रीय संगीतातही करिअर केले आहे. लहानपणीच त्याला गायनाची आवड निर्माण झाली. आम्ही अनेक ठिकाणी गायनाचा क्लास लावण्यासाठी प्रयत्न केले. तेव्हा पुण्याचे प्रख्यात गायक, तबलावादक आणि नर्तक बाजीराव सोनवणे त्यांनी घरी येऊन त्याला शिकवणे सुरू केले. वयाच्या पाचव्या वर्षी भूषणने सवाई गंधर्व महोत्सवात पंडित भीमसेन जोशी, गंगूबाई हनगल यांच्या मैफलीत शास्त्रीय गायन सादर करून वाहवा मिळवली.

भूषण म्हणाला, भारतभर माझे ३०० पेक्षा जास्त संगीताचे कार्यक्रम झाले आहेत. त्यामुळे माझा आत्मविश्वास खूप वाढला. अपयशाची भीती कधीच वाटली नाही. संगीत श्वास आणि सीए हा ध्यास होता. त्यामुळे दोन्ही क्षेत्रांत करिअर करता आले. तो भावगीत, सुगम गीतांसह कर्नाटकी, गझल गायन करतो. सीएच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत त्याने मानाचे स्थान पटकावले आहे. या गुणांमुळे तो आता मोटिव्हेशन गुरू बनला आहे. देशभर त्याने २०० पेक्षा जास्त ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे कार्यक्रम सादर केले आहेत.

बारावीनंतर सीएचा अभ्यास सुरू केला. सीएची कोणतेही पुस्तके ब्रेल लिपीतून किंवा ऑडिओ कॅसेटच्या रूपात नाहीत. त्यामुळे आई-वडील पुस्तके वाचायचे आणि भूषण एेकायचा असा.असा अभ्यास करत तो पहिल्याच प्रयत्नात सीए झाला. त्याच्या या यशामध्ये त्याची आई विजया व वडील नंदकिशोर हे भूषणच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे भूषण अभिमानाने सांगतो.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.