Chinchwad: राष्ट्रवादीची खेळी, प्रशांत शितोळे यांचा अर्ज बाद, राहुल कलाटे यांना देणार पाठिंबा ?

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीकरिता प्रशांत शितोळे यांचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म दिला नसल्यामुळे शितोळे यांचा अर्ज बाद झाला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीने जाणीवपूर्वक एबी फॉर्म न देता खेळी केली असून आता अपक्ष अर्ज भरलेले शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांना पाठिंबा दिला जातो का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी चिंचवड मतदारसंघात शुक्रवारी (दि. 4) या अंतिम मुदतीत 19 उमेदवारांनी 28 अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांची आज (शनिवारी) छाननी झाली. त्यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार प्रशांत शितोळे यांनी दाखल केलेला अर्ज बाद झाला. पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म दिला नसल्यामुळे शितोळे यांचा अर्ज बाद झाला आहे.

त्यांच्यासोबत शंकर पाडुरंग जगताप, विजय निवृत्ती वाघमारे, राजकुमार घनश्याम परदेशी, प्रकाश भाऊराव घोडके अशा पाच उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद झाले आहेत. नामनिर्देशन पत्र लोकप्रतिनिधित्व अधिनियमातील नियम 33 नुसार हे अर्ज बाद करण्यात आल्याचे, निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा कुंभार यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.