Chinchwad : राष्ट्रवादी युवक काँग्रेस आपल्या दारी संवाद अभियान

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदार संघाचे आघाडीचे उमेदवार पार्थ अजित पवार यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून राष्ट्रवादी युवक काँग्रेस आपल्या दारी या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे.

गुरुवारी (दि.18) भोईर नगर, प्रेमलोक पार्क, दळवी नगर,गिरिराज हौसिंग सोसायटीमधील नागरिकांशी संवाद साधण्यात आला. राष्ट्रवादी युवक काँग्रेस व महिलांचा या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल वाकडकर, प्रदेश संघटक विशाल काळभोर, युवक काँग्रेस उपाध्यक्ष हर्षवर्धन भोईर, मयूर जाधव, अक्षय फडतरे, किरण जाधव, आलोक गायकवाड, आकाश गवळी, प्रमोद नलवडे, उमेश कदम, गणेश नलवडे, निलेश क्षीरसागर, आदित्य शिंदे, विकास माने, श्रेयश धनवे, बाप्पू माने, भारद्वाज वाघोदे, तुषार महाजन, प्रसाद महाजन, अभिषेक जराड, दिनेश ढगे सहभागी झाले होते.

पिंपरी-चिंचवड बचतगट महासंघातील प्रतिभा कंकाळे, किरण भोईर, अंजली भोसले, मीनाक्षी पोईपकर, वैशाली शिंदे, अर्चना बोरसुणे, मंगल ढगे, अनिता गायकवाड़,सुप्रिया भिंगारे, रत्ना सेगर, उज्वला बनकर, रीना पेटकर आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.