Chinchwad : राष्ट्रवादीकडून प्रशांत शितोळे तर शिवसेनेचे राहुल कलाटे यांचा अपक्ष अर्ज

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार प्रशांत शितोळे यांनी आज (शुक्रवारी) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी देखील अपक्ष अर्ज दाखल केला आहे.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा कुंभार यांच्याकडे दोघांनीही अर्ज सादर केले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

प्रशांत शितोळे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, महायुतीत चिंचवड मतदारसंघ भाजपला सुटला आहे. त्यामुळे शिवसेनेचे इच्छुक असलेले राहुल कलाटे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.