Chinchwad : शेजाऱ्याला भांडण करू नका सांगत असताना दुसऱ्या शेजाऱ्याने मारली लाथ; ज्येष्ठ नागरिक जखमी

एमपीसी न्यूज : एका शेजाऱ्याला भांडण करू (Chinchwad) नये सांगत असताना दुसऱ्या शेजाऱ्याने लाथ मारल्याने ज्येष्ठ नागरिक जखमी झाल्याची घटना अजंठा नगर चिंचवड येथे घडली आहे. आरोपी ज्येष्ठ नागरिकास अटक करण्यात आली आहे.

याबाबत प्रल्हाद वाघमारे (वय 70 वर्षे, रा.चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आसाराम सोनवणे (वय 65 वर्षे, रा. चिंचवड) या आरोपी विरोधात भा.द.वि कलम 325 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dehu : दुचाकीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

फिर्यादी 21 नोव्हेंबर रोजी सकाळी घरी असताना त्यांच्या घराच्या (Chinchwad) पाठीमागील बाजूस राहणाऱ्या जोडप्याची भांडण होऊन ते मोठमोठ्याने आरडाओरडा करत होते. तेव्हा फिर्यादी हे भांडणाऱ्या जोडप्याला भांडणे करू नका मला झोपायचे आहे असे सांगत होते. त्यावेळी फिर्यादीच्या घराशेजारी राहणारा आरोपीने मी झोपलो आहे. तू आरडाओरडा कशाला करतोस? म्हणत फिर्यादीच्या पोटात लाथ मारली. त्यामुळे फिर्यादी हे पाण्याने भरलेल्या बादलीवर पडल्याने कमरेला उजव्या बाजूस मुक्का मार लागून जखमी झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.