Chinchwad : दुधाचे वाटप करत नववर्षाचे स्वागत; श्री फत्तेचंद जैन विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा उपक्रम 

एमपीसी न्यूज – सरत्या वर्षाला निरोप देत आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाईपासून अबालवृद्धांपर्यंत सर्वच उत्साहात असतात. अनेकजण दारूच्या नशेत बेधुंद होऊन डीजेच्या तालावर नाचून थर्टीफस्ट साजरे करतात.तरुणाई फॅशनच्या नावाखाली दारु पिण्याकडे आकर्षित होत आहे. ही चंगळवादाची मानसिकता बदलावी यासाठी श्री फत्तेचंद जैन विद्यालयाच्या 1994 मधील बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी आज (सोमवारी) चिंचवड येथे दुधाचे वाटप करून ‘दारू नको, दूध प्या’, ‘दूध प्या, सशक्त रहा’  असा संदेश दिला.

चिंचवड येथील चापेकर चौकात सायंकाळी सात ते रात्री दहा या वेळेत नागरिकांना मोफत दुधाचे वाटप करण्यात येत आहे. श्री फत्तेचंद जैन विद्यालयाच्या 1994 मधील बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी हा अभिनव उपक्रम राबविला आहे. 50 लीटर दुधाचे वाटप करण्यात येणार आहे. यावेळी शिवसेनेचे मावळ जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदिप लोंढे, पोलीस मित्र संघटनेचे गजानन चिंचवडे , नगरसेवक राजू गावडे यांच्यासह माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

पंकज जोशी म्हणाले कि , माजी विद्यार्थ्यांनी हाती घेतलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. इतर शाळा, महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी असे समाज उपयोगी उपक्रम हाती घेतले पाहिजे.

ऋषिकेश गुजर म्हणाले कि ,  दारू पिऊन नववर्षाची सुरुवात करण्यापेक्षा दूध पिऊन करणे कधीही चांगले आहे. फत्तेचंदच्या माजी विद्यार्थ्यांना अश्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा

जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे म्हणाले, ”सरत्या वर्षाचे आभार मानून कडू-गोड आठवणींचा संचय घेऊन आगामी वर्षात पदार्पण करताना अनेकजण दारूचा पहिला अनुभव घेतात. दारूच्या नशेत बेधुंद होऊन व्यसनाधीनतेकडे वाटचाल करतात. त्यामुळे अनेकांचे जीवन उद्धवस्त होते. तरुणाईला या व्यसनाधीनतेतून बाहेर काढण्यासाठी ‘दूध प्या, सशक्त रहा’  हा उपक्रम घेतला आहे. दारुचा अनुभव घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करण्यापेक्षा दुधाचा ग्लास घेऊन सर्वांनी नवीन वर्षाची सुरुवात करावी”.

कार्यक्रमाचे आयोजन आणि संकल्पना अमित तलाठी यांची होती तर , नियोजन समितीमध्ये सचिन साकोरे, राकेश गावडे, धीरज वर्मा, अंकुश नाझरे, प्रशांत शितोळे, योगेश वर्मा, विनीत शिंदे, अमेय दाणी, स्वप्नील लवलेकर, संदीप मांडके या माजी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.