Chinchwad News: शहरात 14 लाख 37 हजार मतदार, पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मतदार चिंचवडमध्ये

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मतदार चिंचवड विधानसभा (Chinchwad News) मतदारसंघात आहेत. भोसरीचा क्रमांक जिल्ह्यात तिसऱ्या स्थानावर आहे. पिंपरी, चिंचवड, भोसरी या तिन्ही मतदारसंघ मिळून 14 लाख 37 हजार 383 मतदार असून ताथवडेमध्ये नऊ हजार 575 मतदार आहेत. मात्र, ताथवडेचा समावेश भोर विधानसभा मतदारसंघात आहे.

मतदार ओळख पत्राला आधार कार्ड लिंक; नाव, वय, पत्यात दुरुस्ती; मयत व नवीन नोंदणी अशा दुरुस्त्या झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने पाच जानेवारी रोजी विधानसभा मतदारसंघनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात सर्वाधिक मतदार चिंचवड विधानसभा (Chinchwad News) मतदारसंघात आहेत.

भोसरीचा क्रमांक जिल्ह्यात तिसऱ्या स्थानावर आहे. असे असले तरी, गेल्या वर्षी 31 मे रोजी जाहीर मतदार यादीच्या तुलनेत आता शहरातील मतदारसंख्येत 53 हजार 735  ने घट झाली आहे. यात चिंचवड व भोसरीसह पिंपरी मतदारसंघाचाही समावेश आहे. या तिन्ही मतदारसंघ मिळून 14 लाख 37 हजार 383 मतदार असून ताथवडेमध्ये नऊ हजार 575 मतदार आहेत. मात्र, ताथवडेचा समावेश भोर विधानसभा मतदारसंघात आहे. त्यासह शहरातील एकूण मतदारसंख्या 14 लाख 46 हजार 958 झाली आहे.

Makar Sankrant : यंदा मकर संक्रांत 14 ऐवजी 15 जानेवारीला का?

महापालिकेची पंचवार्षिक मुदत 13 मार्च 2022 रोजी संपली आहे. त्यामुळे फेब्रुवारी 2022 मध्ये महापालिका निवडणूक होणे आवश्यक होते. मात्र, कोरोना व लॉकडाउनच्या कारणामुळे ती होऊ शकली नाही. त्यानंतर ओबीसी आरक्षण व राज्यातील राजकीय घडामोडी यामुळे निवडणूक लांबली आहे. फेब्रुवारी 2022 ला निवडणूक होईल, यासाठी एक जानेवारी 2022 रोजी जाहीर केलेल्या मतदारयादीनुसार शहराची मतदारसंख्या 14 लाख 46 हजार 149 होती. 31 मे रोजी जाहीर झालेल्या पुरवणी यादीनुसार त्यात 54 हजार 544 मतदारांची भर पडून एकूण मतदारसंख्या 15 लाख 693 झाली होती.

विधानसभा मसदारसंघनिहाय मतदार संख्या

चिंचवड विधानसभा मतदारसंघात (Chinchwad News) 5 लाख 66 हजार 415 मतदार आहे. त्यात 3 लाख 1 हजार 648 पुरुष, 2 लाख 64 हजार 732 महिला आणि 35 इतर मतदार आहेत. पिंपरीत 3 लाख 57 हजार 207 मतदार आहेत. त्यामध्ये 1 लाख 88 हजार 599 पुरुष, 1 लाख 68 हजार 588 महिला आणि इतर 20 मतदार आहेत. तर, भोसरीत 5 लाख 13 हजार 761 मतदार आहेत. त्यामध्ये 2 लाख 82 हजार 764 पुरुष, 2 लाख 30 हजार 912 महिला आणि 85 इतर मतदार आहेत. भोर मतदारसंघातील महापालिका हद्दीत येत असलेल्या ताथवडे परिसरात 9 हजार 575 मतदार आहेत. ताथवडेसह पिंपरी-चिंचवड शहरात 14 लाख 46 हजार 958 मतदार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.