Chinchwad News : गजानन लोकसेवा बँकेची 21 वी वार्षिक सभा संपन्न

एमपीसी न्यूज – श्री गजानन लोकसेवा सहकारी बँक मर्यादित, संभाजीनगर, चिंचवड बँकेची 21 वी वार्षिक सर्व साधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. बँकेचे संस्थापक अध्यक्ष गजानन बाबर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली.

यावेळी बँकेचे उपाध्यक्ष मधुकर बाबर यांध्यास सर्व संचालक मंडळ व सभासद उपस्थित होते.

बँकेचे संस्थापक अध्यक्ष गजानन बाबर यांनी बँकेला पाच सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार व सात उत्कृष्ट एनपीए व्यवस्थापन पुरस्कार मिळाल्याचे सांगितले. लवकरच बँक नवीन वास्तूत स्थलांतरीत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

बँकेला मागील वर्षी 2018-19 सालचा 100 कोटी पर्यंत ठेवी असणाऱ्या बँकांमध्ये पुणे विभागतून कै.पद्मभूषण वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार मिळाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_II

सध्या बँकेच्या दोन शाखा असून, बँकेची आर्थिक स्थिती भक्कम आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात बँकेच्या एकूण ठेवी 49 कोटी असून 25 कोटी कर्ज वाटप झाले आहे. बँकेचा एकूण व्यवसाय 75 कोटी व खेळते भांडवल 55 कोटी आहे.

तसेच बँकेचा ढोबळ एनपीए 4.81 टक्के असून, निव्वळ एनपीए 3.40 टक्के आहे, बँकेला ‘अ’ ऑडिट श्रेणी मिळाली आहे.

यावेळी बँकेच्या खातेदार व कर्जदारांचा प्रातिनिधीक सत्कार गजानन बाबर व संचालक मंडळातर्फे करण्यात आला. समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभूणे यांचा व पदार्थ विज्ञान व सौर ऊर्जा क्षेत्रात डॉक्टरेट पदवी मिळवलेल्या निता मोहिते यांचा सत्कार बँकेचे संस्थापक अध्यक्ष बाबर यांच्या हस्ते करण्यात आला.

सरव्यवस्थापक मंदार सुभाष कुलकर्णी यांनी बँकेच्या आर्थिक स्थितीचा अहवाल सादर केला. सूत्रसंचालन उपाध्यक्ष मधुकर बाबर यांनी केले.
संचालक रमेश वाणी यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.