Chinchwad News : साईनाथ बालक मंदिराचा 51 वा वर्धापन दिन साजरा

एमपीसी न्यूज – श्री साईनाथ शिक्षण संस्थेतर्फे चालविल्या (Chinchwad News) जाणाऱ्या चिंचवड येथील श्री साईनाथ बालक मंदिरचा 51 वा वर्धापन दिन व वार्षिक स्नेहसंमेलन मंगळवार दिनांक 7 मार्च रोजी रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे संपन्न झाले.

बालक मंदिरच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज, निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाचे केंद्र प्रमुख मनोज देवळेकर, शाळेचे  पहिले विद्यार्थी (1972) विलास भोईर, पहिले पालक (1972) भालचंद्र महादर उपस्थित होते. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल धामणे, उपाध्यक्ष प्रा.र. रा. बेलसरे, खजिनदार प्रसाद गणपुले, सदस्या शिल्पागौरी गणपुले, विजया धामणे, संस्थेच्या सेक्रेटरी निशा बेलसरे आदी उपस्थित होते.

चिंचवड देवस्थान ट्रस्टचे प्रमुख मंदार देव महाराज यांनी शाळेच्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त करून सर्व विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिला. 51 व्या वर्षाचा आलेख पाहून मनोज देवळेकर यांनी पूर्व प्राथमिक सर्व शिक्षिकांना शुभेच्छा दिल्या. 1972 पासून अनेक विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये शाळेविषयी आदराचे स्थान आहे. शाळेचे माजी पालक भालचंद्र महादर व माजी विद्यार्थी विलास भोईर यांनी शाळेविषयी भरभरून शुभेच्छा दिल्या. आजही शाळेचे अनेक विद्यार्थी उत्तम प्रगती, सर्व क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेले असून सर्वांनी शाळेविषयी अनेक अनुभव सांगितले.

Talegaon News : कारला ट्रक घासला म्हणून ट्रक चालकास लुटले

सन 1972 ते 2023 या शैक्षणिक वर्षामधील संस्मरणीय घटनांचा प्रवास स्लाईड शोद्वारे दाखवण्यात आला. यातून प्रमुख उपस्थितांसमोर बालक मंदिरच्या यशाचा प्रवास उलगडण्यात आला.

10 फेब्रुवारी 1972 रोजी केवळ 17 विद्यार्थ्यांना घेऊन स्वतःच्या घरामध्ये बालवाडी सुरू करणाऱ्या श्री साईनाथ बालक मंदिरच्या संस्थापिका निशाताई बेलसरे यांनी सेवेचा 51 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. लहान रोपाचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. त्यांनी आजपर्यंत शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करून अनेक विद्यार्थ्यांना संस्कारक्षम आनंददायी बाल शिक्षण दिले. त्यांना आजपर्यंत त्यांच्या कार्यासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित केले गेले. उत्तम बालनाट्य, बालगीत, बालअभिनय, नाट्यलेखन, नाट्यदिग्दर्शन, पालकांसाठी प्रबोधनपर व्याख्याने देणाऱ्या शिक्षण क्षेत्रात आपले वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवणाऱ्या निशाताई बेलसरे यांचा मंदार देव महाराज यांच्या हस्ते सेवा गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

Bachhu Kadu : आमदार बच्चू कडू यांना 2 वर्षांची शिक्षा

कार्यक्रमाचे औचित्य साधून अनेक माजी विद्यार्थी तसेच पालक माजी शिक्षक यांचा स्नेह मेळावा झाला. पुणे, सोलापूर, मुंबई, हडपसर, ठाणे, बीड, सातारा, नागपूर येथून माजी विद्यार्थी आपल्या लाडक्या बाईंना भेटण्यासाठी आले होते.

सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय सुरेख असा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला. छोट्या मुलांच्या स्वागतगीतानंतर विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाने सुरुवात झाली. त्यानंतर बाल वर्गातील वेदश्री पारगावकर हिने सुंदर पोवाडा सादर केला.  खेळ वर्गातील मुलांनी सर्कशीतले जोकर आम्ही, मुंग्या आम्ही, आईने बागेत, I am so happy यासारख्या गीतांवर मुलांनी नाच केला. शार्वी अष्टेकर हिने ‘अग्गोबाई ढग्गोबाई’ हा नाच  सादर केला. तसेच बाल वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी शिवराज्याभिषेक ही नाटिका सादर केली .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका वैभवी तेंडुलकर यांनी केले. कार्यकारी मुख्याध्यापिका रेवती नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाती कुलकर्णी, प्रज्ञा पाठक, मानसी कुंभार, शीतल कुलकर्णी, प्रज्ञा जोशी, योगिता देशपांडे यांनी संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.