Chinchwad News : प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्समध्ये 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा

एमपीसी न्यूज –  चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्समध्ये 74 वा प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण प्रसिद्ध उद्योजक लायन रमेश शहा यांच्याहस्ते करून उत्साहात साजरा (Chinchwad News) करण्यात आला.

यावेळी प्रा. डॉ. बाबासाहेब सांगळे, प्रा. डॉ. पोर्णिमा कदम, उपप्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, डॉ. वनिता कुर्‍हाडे, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, मुख्याध्यापिका सविता ट्रॅवीस, एम.बी.ए. चे संचालक डॉ. सचिन बोरगावे समवेत प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक समवेत शिक्षकेत्तर कर्मचारी ध्वजारोहणासाठी उपस्थित होते. ध्वजारोहणापूर्वी प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सैनिकी वेशभूषेत डोळ्याचे पारणे फेडणारे पथसंचालन बँड पथकासह करीत उपस्थितांना मानवंदना दिली.

Chinchwad Bye Election : आचारसंहितेची ‘ऐसी की तैसी’ ; राजकीय फ्लेक्‍सकडे दुर्लक्ष

प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव साजरा करण्यात आला. देशभक्तीपर गीते, पारंपारिक लोकनृत्य मल्लखांब, कवायत आदी कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले. मुख्याध्यापिका सविता ट्रॅवीस, उपमुख्याध्यापिका लिजा सोजू, क्रीडा शिक्षक मारीआपन मुरलीयार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी मोलाचे योगदान दिले.

तर ध्वजारोहण कार्यक्रमासाठी क्रिडा अधिकारी डॉ. आनंद लुंकड, पांडुरंग इंगळे, शबाना शेख, अक्षय परदेशी आदींनी विशेष परिश्रम घेतले. तसेच, लोकशाही संविधानाचा इतिहास यावेळी विस्तृतपणे विशद (Chinchwad News) केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पल्लवी चूग यांनी केले. तर, आभार डॉ. सचिन बोरगावे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.