Chinchwad News: पिंपरी-चिंचवड शहरातून एक कंटेनर, पाच दुचाकी चोरीला

शहरातील एमआयडीसी भोसरी, चाकण, चिखली, हिंजवडी आणि वाकड पोलीस ठाण्यात वाहन चोरीचे एकूण सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरीचे सत्र सुरूच आहे. गुरुवारी (दि.3) शहरातील एमआयडीसी भोसरी, चाकण, चिखली, हिंजवडी आणि वाकड पोलीस ठाण्यात वाहन चोरीचे एकूण सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये एक कंटेनर चोरीचा देखील गुन्हा दाखल आहे.

इमाम मुबारक मुलाणी (वय 32, रा. च-होली बु. ता. हवेली) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी मुलाणी यांनी त्यांची आठ हजार रुपये किमतीची स्प्लेंडर दुचाकी (एमएच 14 बीझेड 5900) 2 सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता हवालदार वस्ती, मोशी येथील महालक्ष्मी मोड्युलर किचन या दुकानासमोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. 3 सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता हा प्रकार उघडकीस आला.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात आणखी एक वाहन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अनिल दशरथ माने (वय 45, रा. सनसर, ता. इंदापूर) यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी माने यांचा पाच लाख रुपये किमतीचा कंटेनर (एमएच 12 एमव्ही 0049) 15 मार्च रोजी स्पाईन रोड येथील बाबू शिवाजी घोळवे यांच्या पार्किंगमध्ये पार्क केला होता. अज्ञात चोरट्यांनी त्यांचा कंटेनर चोरून नेला. हा प्रकार 30 ऑगस्ट रोजी उघडकीस आला. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.

भगवान कचरू साळुंखे (वय 35, रा. झीत्राईमळा, आंबेठाण रोड, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी साळुंखे यांनी त्यांची 9 हजार रुपये किमतीची स्प्लेंडर प्लस दुचाकी (एमएच 14 सीव्ही 3488) 31 ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता त्याच्या घरासमोर पार्क केली होती. रात्री चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 1 सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता उघडकीस आला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

निखील जनार्दन कांबळे (वय 28, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कांबळे यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 10 सीवाय 8656) 31 ऑगस्ट रोजी रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केली होती. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. 1 सप्टेंबर रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

समीक्षा विनोद चावडा (वय 25, रा. नेरे दत्तवाडी, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादी चावडा यांनी त्यांची 40 हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी (एमएच 19 डीएच 8534) 30 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी लॉक तोडून चोरून नेली. 1 सप्टेंबर रोजी दुपारी साडेपाच वाजता हा प्रकार उघडकीस आला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

शिराज अरीरुल्ला खान (वय 40, रा. शेख वस्ती, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी खान यांनी त्यांची 48 हजार रुपये किमतीची पल्सर दुचाकी (एमएच 14 एफए 6168) 22 मार्च रोजी त्यांच्या घरासमोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी दुचाकीचे लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 3 सप्टेंबर रोजी उघडकीस आला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.