Chinchwad News: महिलेच्या गळ्यातील 60 हजारांची सोनसाखळी हिसकावली

Chinchwad News: A gold chain worth Rs 60,000 was snatched from a woman's neck शनिवारी रात्री आठ वाजता फिर्यादी महिला कामानिमित्त चिंचवड येथील तालेरा हॉस्पिटल येथे जात होत्या.

एमपीसी न्यूज – रस्त्याने जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेली. ही घटना शनिवारी (दि.8) रात्री आठ वाजता चिंचवड येथील लिंक रोड नाल्यावरील पुलावर येथे घडली.

दुचाकीवरील दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री आठ वाजता फिर्यादी महिला कामानिमित्त चिंचवड येथील तालेरा हॉस्पिटल येथे जात होत्या. लिंक रोडवरील नाल्यावरील पुलावर आल्या असता दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 60 हजार रुपये किमतीची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून नेली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.