Chinchwad News: ‘पुन्हा एक हात मदतीचा…!’ चिखली-आंबेवाडी गावातील 500 पूरग्रस्त कुटुंबांना मदत

एमपीसी न्यूज – भारतीय जनता  पक्षाचे नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे यांनी पूरग्रस्त बांधवांसाठी सुरु केलेल्या मदत संकलन अभियानाला चिंचवडकर नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. विविध साहित्य जमा झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भयंकर झळ बसलेल्या ‘चिखली-आंबेवाडी’ गावातील सुमारे 500 पूरग्रस्त कुटुंबांना ही मदत वाटण्यात आली.

चिंचवडगावातील आदर्श मंडळ श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ ‘चिंचवडचा राजा’ या मंडळाने सर्वप्रथम प्रतिसाद देत किमान 100 नागरिकांच्या परिवारास आवश्यक अशी स्वयंपाकाच्या भांड्याचे किट दिले. त्याचबरोबर चिंचवडगावातील नामांकित शिक्षण संस्था श्री मोरया शिक्षण संस्था (माटे शाळा) यांनी देखील 200 कुटुंबांसाठी आवश्यक अशी मोठ्या प्रमाणात सामग्री दिली. या मदत संकलन अभियानासाठी चिंचवडकर नागरिकांनी देखील उदंड प्रतिसाद देत पूरग्रस्तांसाठी मदत केली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भयंकर झळ बसलेल्या ‘चिखली-आंबेवाडी’ गावातील सुमारे 500 पूरग्रस्त कुटुंबांना आज ही मदत वाटण्यात आली. याकरिता सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील (कोल्हापूर) यांचे विशेष सहकार्य लाभले.

या पूरग्रस्त नागरिकांना मदत मिळावी याकरिता नगरसेवक ॲड.मोरेश्वर शेडगे मित्र परिवार, श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष महेश मिरजकर, भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक आघाडीचे शहर अध्यक्ष धनंजय शाळिग्राम, भाजप मंडल सरचिटणीस नंदू भोगले, अजिंक्य राऊत, सुखदेव खिल्लारी, अतुल कांबळे आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.