Chinchwad News : शहरातील उच्च शिक्षित कुटुंब घेणार जैन धर्माची दीक्षा

चिंचवड येथे या मुमुक्षूंचा सत्कार आणि दीक्षा गीताचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

एमपीसीन्यूज : पिंपरी चिंचवड शहरातील उच्च शिक्षित कुटुंब ( Highly Educated Family) जैन (jain) धर्माची दीक्षा ( initiation) घेत आहे. हे कुटुंब गुजरातमधील पालितणा ( Gujarat , Paalitana) येथे 22 फेब्रुवारी रोजी संयम ग्रहण करणार आहे. तर हुबळी ( Hubali)  येथील अन्य दोघेजण देखील जैन धर्माची दीक्षा घेत आहेत.

या उच्च शिक्षित कुटुंबासह अन्य दोघांचा सत्कार व दीक्षा गीतांचा कार्यक्रम चिंचवड स्टेशन ( chinchwad station) येथील जैन धर्मशाळेत ( jain Dharmshala) मंगळवारी (दि. 26) घेण्यात आला.

भरत सेसमल बाफना, मिनाबेन मन्सालाल जैन (लोणी) आणि स्व. ताराबाई खुबीलाल श्रीश्रीमल परिवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.

_MPC_DIR_MPU_II

आदेश्वर जैन टेम्पल ट्रस्टचे पदाधिकारी, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, नगरसेवक शीतल शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवडचे मनीष भगवान गोडसे, सपना मनीष गोडसे, मुलगा भाविक आणि मुलगी मानसी हे कुटुंब जैन धर्माची दीक्षा घेणार आहेत. 22 फेब्रुवारी 2021 रोजी हे कुटुंब गुजरातमधल्या पालितणा येथील मेवाड भवनमध्ये संयम ग्रहण करणार आहेत.

तसेच चेतन ललित कोठारी आणि हर्ष मुकेश कोठारी 22 फेब्रुवारी 2021 रोजी हुबळी येथे संयम ग्रहण करणार आहेत. कोठारी बंधू मूळचे हुबळी येथील असून त्यांचे मामा पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.