Chinchwad News: येणार आधारवड…, स्वागत करतेय पिंपरी-चिंचवड! शरद पवार यांच्या दौऱ्यानिमित्त राष्ट्रवादीकडून जोरदार फलकबाजी

एमपीसी न्यूज – आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आज आणि उद्या असे दोन दिवस शहर दौ-यावर आहेत. त्यानिमित्त राष्ट्रवादीने जोरदार फलकबाजी केली आहे. येणार आधारवड…, स्वागत करतेय पिंपरी-चिंचवड!, स्वागत साहेबांच… आयटी पार्क सुरु करणा-या दूरदृष्टीचं!, Welcome to the visionary behind Hinjewadi IT Park असे फलक चिंचवड मतदारसंघात झळकले आहेत. माजी विरोधी पक्षनेते, नगरसेवक नाना काटे, नगरसेविका शीतल काटे यांनी जोरदार फलकबाजी केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे. त्यासाठीची आचारसंहिता डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लागू शकते. त्यामुळे निवडणुकीला केवळ अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी राहिला आहे. त्यापार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली. 2017 च्या निवडणुकीत महापालिकेतील सत्ता गमवावा लागलेल्या राष्ट्रवादीने महापालिका पुन्हा ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली आहे. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शहराच्या राजकारणात लक्ष घातले आहे. पवार आज आणि उद्या पिंपरी-चिंचवडच्या दोन दिवसीय दौ-यावर आहे.

आजी-माजी नगरसेवक, पदाधिका-यांची आज बैठक तर उद्या रहाटणीत शरद पवार यांच्या उपस्थित मेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून पवार आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकतील. पवार यांच्या दौ-यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसनेही जोरदार फलकबाजी केली. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील रहाटणी येथील थोपटे लॉन्स येथे कार्यकर्ता मेळावा होत असल्याने चिंचवडमध्ये सर्वत्र पवार यांच्या स्वागताचे फलक झळकले आहेत. राष्ट्रवादीने जोरदार वातावरणनिर्मिती केली आहे.

येणार आधारवड…, स्वागत करतेय पिंपरी-चिंचवड!, स्वागत साहेबांच… आयटी पार्क सुरु करणा-या दूरदृष्टीचं!, Welcome to the visionary behind hinjewadi it park असे फलक चिंचवड मतदारसंघात झळकले आहे. माजी विरोधी पक्षनेते, नगरसेवक नाना काटे, नगरसेविका शीतल काटे यांनी जोरदार फलकबाजी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.