Chinchwad News : मास्क न वापरल्या प्रकरणी 361 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क न लावता नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी पोलिसांकडून कारवाई सुरु आहे. शनिवारी (दि. 8) पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत विनामास्कच्या आदेशाचा भंग करणाऱ्या 361 जणांवर पोलिसांनी कारवाई केली.

_MPC_DIR_MPU_II

शहरातील कोरोना बाधितांची संख्या आणि मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे नागरिकांनी मास्क वापरावा, असे आवाहन महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून केले जात आहे. आदेशांचे भंग करुन मास्क न वापरणाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे.

शनिवारी पोलिसांनी केलेली कारवाई –
एमआयडीसी भोसरी (37), भोसरी (12), पिंपरी (25), चिंचवड (69), निगडी (16), आळंदी (21), चाकण (27), दिघी (03), सांगवी (10), वाकड (12), हिंजवडी (36), देहूरोड (25), तळेगाव दाभाडे (16), तळेगाव एमआयडीसी (04) चिखली (14), रावेत चौकी (12), शिरगाव चौकी (19), म्हाळुंगे चौकी (03)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.