Chinchwad News : विनामास्क फिरणाऱ्या 770 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. शनिवारी (दि. 13) पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 770 जणांवर कारवाई केली.

पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहरात 800 हून अधिक रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

शनिवारी पोलिसांनी 770 जणांवर केलेली कारवाई पुढीलप्रमाणे –
एमआयडीसी भोसरी (74), भोसरी (17), पिंपरी (64), चिंचवड (79), निगडी (84), आळंदी (49), चाकण (32), दिघी (44), म्हाळुंगे चौकी (52), सांगवी (67), वाकड (53), हिंजवडी (26), देहूरोड (27), तळेगाव दाभाडे (04), तळेगाव एमआयडीसी (47), चिखली (30), रावेत चौकी (21), शिरगाव चौकी (00)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.