Chinchwad News : ट्रिनिटी इंजिनियर्समधील 128 कामगारांना कायम करण्याचा करार ; शिवगर्जना कामगार संघटनेच्या प्रयत्नांना यश

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील ट्रिनिटी इंजिनियर्स कंपनीत 128 कामगारांना कायम करण्याचा करार करण्यात आला आहे. शिवगर्जना कामगार संघटना कामगारांना कायम करून घेण्यासाठी प्रयत्नशील होती, अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

शिवगर्जना कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष बेंद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवडमधील ट्रिनिटी इंजिनियर्स ही साधारण पन्नास वर्ष पेक्षा अधिक जुनी कंपनी आहे.

येथील कामगारांना कायम करून घेण्यासाठी शिवगर्जना कामगार संघटना मागील काही वर्षांपासून प्रयत्नशील होती. अखेर, त्या प्रयत्नांना यश आले असून कंपनीने 128 कामगारांना कायम करण्यासाठी करार केला आहे.

आज (गुरुवारी) 128 पैकी 30 कामगारांना कायम करण्याबाबतचे पत्र देण्यात आले. यावेळी कामगारांच्या वतीने शिवगर्जना कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष बेंद्रे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कंपनीच्या या निर्णयाचे कामगारांनी स्वागत केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.