Chinchwad News : ‘यॉर्क ट्रान्सपोर्ट’च्या वतीने लोकमान्य हॉस्पिटलला रूग्णवाहिका भेट

एमपीसी न्यूज – यॉर्क ट्रान्सपोर्ट इक्यूपमेंट कंपनीच्या सीएसआर निधीतून चिंचवड येथील लोकमान्य होलिस्टिक कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटरला रूग्णवाहिका प्रदान करण्यात आली. जागतिक कर्करोग सप्ताहाच्या निमित्ताने शुक्रवारी (दि.12) हा कार्यक्रम पार पडला.

कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी बिकाश पहाडी, देखभाल व्यवस्थापक राहुल गायकवाड, तसेच रिसर्च सेंटरचे विश्वस्त शास्त्रज्ञ डॉ. विक्रम घोले, सीओओ डॉ. सुनिल पेंढारकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल क्षीरसागर आदी उपस्थित होते.

कंपनीचे देखभाल व्यवस्थापक राहुल गायकवाड म्हणाले, कर्करोग जनजागृती व आरोग्य शिबिर यासाठी आमच्याकडून लोकमान्य कॅन्सर सेंटरला पूर्ण सहकार्य करेल.

सूत्रसंचालन लोकमान्य रिसर्च सेंटरचे संचालक श्रीनिवास पत्तार यांनी केले. गृप सीओओ सुनिल काळे यांनी आभार मानले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.