Chinchwad News : अनिकेत दळवी यांच्याकडुन ​प्रभागातील ​नागरिकांना तिळगुळ वाटप

एमपीसी न्यूज – मकरसंक्रांतीच्या निमित्ताने प्रभाग 17 व 19 मधील सुमारे 10 हजार नागरिकांना तिळगुळ वाटप करण्यात आले. आमदार लक्ष्मण जगताप व नगरसेवक शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अनिकेत दळवी यांच्या वतीने हे वाटप करण्यात आले.

प्रभाग क्र.17 आणि 19 मधील दळवीनगर, पांढरकर चाळ, समर्थ कॉलनी, भोईरनगर, इंदिरानगर, प्रेमलोक पार्क येथील सर्व सोसायट्या तसेच उद्योगनगर, खांबे मळा, उद्योगनगर मधील सर्व सोसायटीत, S.K.F कॉलनी, विजयनगर, बिजली नगर, शिवनगरी येथील सर्व नागरिकांना तिळगुळ वाटप करण्यात आले.

प्रभागातील सफाई कर्मचारी, दवाखान्यातील डॉक्टर नर्स, वार्ड बॉय यांना तिळगुळ वाटप करुन मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.