Chinchwad News: जिजाऊ पर्यटन केंद्रातील कृत्रिम प्राण्यांची तोडफोड, उद्यान विभागाची ढिसाळ सुरक्षा व्यवस्था – अश्विनी चिंचवडे

दुर्लक्ष करणा-यांकडून नुकसान भरपाई घ्या, दोषी संस्थेवर कारवाईची मागणी

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील जिजाऊ पर्यटन केंद्रामधील कृत्रिम प्राण्यांची तोडफोड आणि वृक्ष परिसरात समाजकंटकांकडून जाळपोळ करण्यात आली आहे. उद्यान विभागाची ढिसाळ सुरक्षा व्यवस्था, दुर्लक्षामुळेच पालिकेच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचा आरोप शिवसेना नगरसेविका अश्विनी चिंचवडे-पाटील यांनी केला आहे. दरम्यान, हा प्रकार बुधवारी (दि.23) घडला आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात नगरसेविका चिंचवडे यांनी म्हटले आहे की, श्री मोरया गोसावी मंदिरा लगत जिजाऊ पर्यटन केंद्र आहे. या केंद्रात महापालिकेने कृत्रिम प्राण्यांची प्रतिकृती बसविले आहेत.

मोठ मोठी झाडे आहेत. या उद्यानात नागरिकांची मोठी वर्दळ असते. बुधवारी समाजकंटकांकडून उद्यानातील कृत्रिम प्राण्यांची प्रतिकृतीची तोडफोड करण्यात आली आहे. नारळ, बांबुचे झाडे जाळली आहेत.

उद्यान व सुरक्षा विभागाच्या दुर्लक्ष, हलगर्जी, ढिसाळ सुरक्षा व्यवस्था, निष्काळजीपणामुळेच हा प्रकार घडला आहे. उद्यानातील सुरक्षा व्यवस्था अतिशय ढिसाळ आहे. कडक सुरक्षा व्यवस्था नसल्यास भविष्यात मोठा चुकीचा प्रकार घडू शकतो कारण शेजारी श्री मोरया मंदिर व पवना नदीपात्र आहे.

याप्रकरणात संबधित एजन्सीकडून अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. त्यासाठी दोषी एजन्सीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे महापालिकेचे अधिकारी यांना भविष्यात असे प्रकार घडू नयेत.

याकरिता संबधित एजन्सीकडून करारनामा अटी-शर्तीनुसार काम करून घेण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी नगरसेविका चिंचवडे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.