-MPC-TOP-MOST-BANNER-I

Chinchwad News : अभिनय स्पर्धेत आशा देशमुख राज्यात प्रथम ; महापौर माई ढोरे यांच्या हस्ते सत्कार

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – चिंचवडमधील आशा देशमुख यांनी राज्यस्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा 2021 मध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. ज्ञानमैत्री सामाजिक व शैक्षणिक संस्था आणि सुबोध चित्र ( नाट्य शाखा), जिल्हा ठाणे या संस्थेकडून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अभिनय स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर उषा ढोरे यांनी आशा देशमुख यांचा अभिनंदन पत्र देऊन सन्मान केला.

याप्रसंगी भाजपा उत्तर भारतीय आघाडीच्या प्रदेश महिला अध्यक्षा संजीवनी पांडे उपस्थित होत्या.

‘सर्वांच्या सहकार्यामुळे आज मी इथपर्यंत पोहचू शकले, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद,’ अशी प्रतिक्रिया आशा देशमुख यांनी यावेळी दिली. आशा नरेंद्र देशमुख यांनी नाशिक, चिंचवड व पुणे येथे शैक्षणिक क्षेत्रात पर्यवेक्षिका म्हणून काम पाहिले आहे. द

हावी, बारावी व्हेकेशन क्लासेस देखील घेतले आहेत. चिंचवड मधील भारत माता सत्संग मंडळाचे विश्वस्त प्रशांत हरहरे, संजय भंडारी, मीनाक्षी आठवले यांच्यासोबत मंडळाच्या माध्यमातून 800 कुटुंब जोडून, गेल्या 14 वर्षांपासून त्या सातत्याने जनजागृतीचे काम करत आहेत.

स्वामी भक्त असणा-या आशा देशमुख चिंचवड येथील बकाऊ वोल्फ कॉलनीत असणाऱ्या ‘श्री स्वामी समर्थ’ मठात गेल्या 12 वर्षांपासून स्वामींची सेवा करत आहेत. स्वामींच्या आरतीला त्या रोज सकाळी न चुकता उपस्थिती लावतात. स्वामी जयंतीचा उत्सव दरवर्षी साजरा करून मनोभावे स्वामींची सेवा करतात.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn