Chinchwad News : अश्विनी जगताप यांनी घेतली आमदारकीची शपथ

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत (Chinchwad News) विजयी झालेल्या अश्विनी जगताप यांनी आज आमदारकीची शपथ घेतली. मुंबईत सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी जगताप यांना शपथ दिली. जगताप या निवडून आलेल्या शहरातील पहिल्या महिला आमदार आहेत.

चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी यांनी चिंचवडचा गड कायम राखला. 36 हजार 168 चे मताधिक्य घेवून अश्विनी जगताप यांनी चिंचवडमध्ये कमळ फुलविले. त्यांना एक लाख 35 हजार 603 मते मिळाली. तर, त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे नाना काटे यांना 99 हजार 435 मतांवर समाधान मानावे लागले. अपक्ष राहुल कलाटे यांनी 44 हजार 112 इतकी मत घेतली.

Pune : डेक्कन कॉलेजमध्ये शनिवारी मेहेरबाबा जीवन परिचय सत्राचे आयोजन

मागील गुरुवारी मतमोजणी झाली होती. निवडणूक विभागाने प्रमाणपत्र पाठविल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी जगताप यांना शपथ घेण्यासाठी आज बोलविले होते. त्यानुसार अश्विनी जगताप यांनी विधानसभेत आमदारकीची शपथ (Chinchwad News) घेतली. जगताप या शहरातील निवडून आलेल्या पहिल्या महिला आमदार ठरल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.