Chinchwad News : सहाय्यक आयुक्त राजाराम पाटील यांची कोल्हापूर येथे बदली

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांची कोल्हापूर येथे बदली झाली आहे. तर त्यांच्या जागी प्रशांत अमृतकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या गृह विभागाने आज (दि. 22) याबाबतचे आदेश दिले. गृह विभागाने पोलीस उप अधीक्षक / सहाय्यक आयुक्त संवर्गातील पाच पोलीस अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत.

राजाराम पाटील यांची पिंपरी-चिंचवड येथून कोल्हापूर येथे बदली करण्यात आली आहे. कोल्हापूर पोलिसांच्या करवीर उपविभागात पाटील यांची उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

तर करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत अमृतकर यांची पिंपरी-चिंचवड शहरात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून बदली केली आहे.

रोशन पंडित यांची अहमदनगर पोलीस उपाधीक्षक (मुख्यालय) येथून सहाय्यक पोलीस आयुक्त नागपूर येथे बदली झाली आहे.

शशिकांत काशीद यांची उस्मानाबाद पोलिसांच्या कळंब उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी येथून उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड उपविभाग, रत्नागिरी येथे बदली झाली आहे.

भारत काकडे यांची अपर पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, अमरावती येथून उपविभागीय पोलीस अधिकारी, पाचोरा उपविभाग, जळगाव येथे बदली झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.