Chinchwad News : वाढदिवसाचा खर्च टाळून केली कोरोनाबाबत जनजागृती

एमपीसी न्यूज – चिंचवड, संभाजीनगर येथील कुशाग्र युथ फाऊंडेशचे अध्यक्ष कुशाग्र कदम यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून कोरोनाबाबत जनजागृती केली. त्यांनी वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द करुन सामाजिक भान राखत कोरोना साथ नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने प्रभाग क्रमांक 10 संभाजीनगर, शाहूनगर परीसरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन कोरोना साथीबाबत जनजागृती केली.

नागरिकांसाठी कोरोना या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेसाठी नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्याच प्रमाणे खुली चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, नृत्यस्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. या तिन्ही स्पर्धेतील विजेत्यांना रोख स्वरुपात बक्षीस वाटप करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरातूनच सहभाग नोंदविला होता.

इयत्ता दहावी व बारावीमध्ये उत्तम गुण मिळविणा-या गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करुन त्यांना फाईल फोल्डर भेट म्हणून देण्यात आले. त्याच प्रमाणे परीसरातील 500 ज्येष्ठ नागरिकांना कोरोना विषाणू संसर्गांबाबत घ्यावयाची दक्षता याबाबत प्रबोधन करुन त्यांना वाफेचे भांडे (स्टिमर) भेट देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.