Chinchwad News : मनसेच्या शिबिरात 41 दात्यांचे रक्तदान

एमपीसीन्यूज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेत मनसे महिला आघाडीच्या शहराध्यक्षा अश्विनी बांगर यांच्या पुढाकारातून चिंचवड येथे नुकतेच रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिरात एकूण 41 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

कोरोनाच्या संकटात पिंपरी चिंचवड आणि परिसरात रक्ताची कमतरता जाणवत आहे. अशा परिस्थितीत रुग्णांच्या नातेवाईकांना रक्ताच्या शोधात धावपळ कारवाई लागत आहे. रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळीच रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी रक्तदान शिबीर घेण्यात आल्याची माहिती अश्विनी बांगर यांनी दिली.

आधार ब्लड बॅक आणि चिंचवडगावातील प्रेम सागर सोसायटी यांच्या सहयोगाने हे शिबिर आयोजित करण्यात आले. या वेळी 41 रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिरात सहभागी झालेल्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या आधीही अश्विनी बांगर यांनी रक्तदान शिबिर आयोजित केली आहेत.

मनसे प्रभाग अध्यक्ष प्रविण माळी आणि तेजस दाते यांनीही शिबिरासाठी सहकार्य केले. ऋशिकेश जाधव, शुभम इंगळे, तुषार कामे, स्नेहल बांगर, संध्या कुलकर्णी, अंबर मोघे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.