Chinchwad news: शहर काँग्रेसच्या शिबिरात 75 दात्यांचे रक्तदान

एमपीसी न्यूज – महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी- चिंचवड शहर काँग्रेसच्या वतीने आज (बुधवारी) आयोजित रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. या शिबिरात 75 जणांनी रक्तदान केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेस सचिन साठे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शिबिराचे उदघाटन करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा श्यामला सोनवणे, सरचिटणीस सज्जी वर्की, भोसरी ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष विष्णुपंत नेवाळे, प्रदेश अल्पसंख्याक सेल उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, माजी नगरसेवक राजू गोलांडे, प्रदेश कॉंग्रेस अनु. जाती विभागाचे कार्याध्यक्ष गौतम आरकडे, प्रदेश युवक सरचिटणीस मयुर जयस्वाल, सेवादल अध्यक्ष मकरध्वज यादव, युवक काँग्रेसचे चंद्रशेखर जाधव, गौरव चौधरी, विशाल कसबे, जिफिन जॉन्सन, संदेश बोर्डे, कुंदन कसबे, ज्येष्ठ नागरिक सेल शहराध्यक्ष लक्ष्मण रुपनर, अर्जुन खंडाळे, अमर नाणेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या उपक्रमासाठी चंद्रशेखर जाधव, जिफिन जॉन्सन यांनी विशेष परिश्रम घेतले. रक्तदात्यांना साठे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.