Chinchwad news: पाईपलाईनसाठी खोदाई केल्याने केबल उघड्यावर, अपघात होण्याचा धोका

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवडगांव येथे पाण्याच्या पाईपलाईनसाठी रस्ते खोदाईचे काम सुरू आहे. पण, ज्या ठिकाणी मोठ्यामोठ्या केबल आहेत त्या ठिकाणी तत्परतेने काम पूर्ण केले जात नाही. त्यामुळे नागरिकांना येजा करताना त्रास होतो. या केबल अनेक दिवस उघड्याच असतात. बुजविल्या जात नाहीत. त्यामुळे अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पालिकेने तत्काळ केबल बुजविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

महापालिकेच्या वतीने चिंचवडगावात पाण्याच्या पाईपलाईनचे काम करण्यात येत आहे. त्यासाठी खोदाई केली जाते. ज्या ठिकाणी मोठ्यामोठ्या केबल आहेत. त्या ठिकाणी तत्परतेने काम पूर्ण केले जात नाही.

चिंचवडमध्ये गृहनिर्माण सोसायटीच्या जाण्यायेण्याच्या मार्गावर केबल आणि खड्डा अर्धवट बुजवल्या अवस्थेत आहे. तसेच केबल उघड्यावर आहेत. या ठिकाणाहून वृद्ध,लहान मुलांची वर्दळ असते. त्यामुळे तोल जाऊन अपघात होण्याची दाट शक्यता आहे.

तसेच नागरिकांना ये-जा करताना मोठा त्रास होत आहे. दुचाकी सुद्धा गृहनिर्माण सोसायटीच्या जागेत नेता येत नाहीत. पाईपलाईनचे काम करताना अश्या स्वरूपाची कामे लवकर पूर्ण व्हावीत. याची जबाबदारी पालिकेची नाही का ? ड्रेनेजवरील झाकण अश्या स्थितीत असताना त्यावरून जबरदस्तीने वाहने जात येत आहेत.

त्यामुळे पुन्हा ड्रेनेज तुटणार मग पुन्हा ते दुरुस्ती म्हणजे नागरिकांनी कर भरायचे आणि नियोजन शून्यतेमुळे त्याची शिक्षा पुन्हा नागरिकांनाच यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.