Chinchwad News: शनिवारी शहरातील 125 जणांवर खटले

एमपीसी न्यूज – टाळेबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणा-या 125 जणांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शनिवारी (दि. 3) भारतीय दंड विधान कलम 188 नुसार खटले दाखल केले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे वारंवार आवाहन केले जात आहे. तरीही नागरिक त्याचे पालन करताना आढळत आहेत. मास्क न वापरणा-यांवर प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. जे नागरिक दंड भरणार नाहीत, त्यांच्यावर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार कारवाई केली जात आहे.

शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून कोरोनाची साखळी तोडावी लागणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी 598 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधितांची संख्या 79 हजार 936 एवढी झाली आहे. तर शनिवारी तब्बल 22 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शनिवारी केलेली कारवाई –
एमआयडीसी भोसरी (6), भोसरी (6), पिंपरी (15), चिंचवड (5), निगडी (9), आळंदी (20), चाकण (8), दिघी (3), म्हाळुंगे चौकी (3), सांगवी (20), वाकड (2), हिंजवडी (8), देहूरोड (4), तळेगाव दाभाडे (7), तळेगाव एमआयडीसी (3), चिखली (14), रावेत चौकी (6), शिरगाव चौकी (4)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.