Chinchwad News : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय तरीही नागरिक ऐकायला तयार नाहीत; मास्क न वापरणाऱ्या आणखी 376 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढत आहे. दररोज हजारोंच्या संख्येने नवीन रुग्णांची भर पडत आहे. तरीही नागरिक खबरदारी घेण्याच्या मूडमध्ये नसल्याचे चित्र शहरात दिसत आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शनिवारी (दि. 10) मास्क न वापरल्या प्रकरणी 376 जणांवर कारवाई केली आहे.

शहरात कोरोनाचा प्रसार वाढतच आहे. प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई देखील केली जात आहे. कोरोना साथ सुरु होऊन एक वर्ष उलटून गेले मात्र अजूनही पोलिसांना नियमभंग करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी लागत आहे. ही मोठी शोकांतिका आहे. अशा नियमभंग करणाऱ्यांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यास मदत होत आहे.

शनिवारी पोलिसांनी केलेली विनामास्कची कारवाई –
एमआयडीसी भोसरी (55), भोसरी (14), पिंपरी (10), चिंचवड (76), निगडी (23), आळंदी (11), चाकण (31), दिघी (07), सांगवी (05), वाकड (24), हिंजवडी (11), देहूरोड (14), तळेगाव दाभाडे (00), तळेगाव एमआयडीसी (15), चिखली (27), रावेत चौकी (28), शिरगाव चौकी (18), म्हाळुंगे चौकी (07)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.