_MPC_DIR_MPU_III

Chinchwad News : पोलीस आयुक्त कार्यालयात नागरिकांना येण्यास मनाई; अत्यावश्यक असल्यास पूर्वनियोजित वेळ घ्यावी लागणार

0

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात नागरिकांना येण्यास मनाई करण्यात आली आहे. एखाद्या प्रकरणात पोलीस आयुक्तांची भेट घेणे अत्यावश्यक असेल, अशा नागरिकांनी पूर्वनियोजित वेळ घेऊन कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून भेट घ्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले आहे.

_MPC_DIR_MPU_IV

पोलीस आयुक्तालयात कार्यक्षेत्रातील नागरिकांचा अगदी किरकोळ समस्यांपासून गंभीर प्रकारणांमधील नागरिकांचा दररोज राबता असतो. त्यामुळे आयुक्त कार्यालयात काम करणारे कर्मचारी तसेच येणारे नागरिक यांना कोरोना साथीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका संभवतो. नागरिक आयुक्तांची भेट घेतल्यानंतर त्यांच्यासोबत फोटो देखील काढतात. अनेकदा नागरिक कोरोनाच्या नियमांचे पालन करताना आढळत नाहीत.

_MPC_DIR_MPU_II

अत्यावश्यक कामासोबतच अनावश्यक गर्दी देखील आयुक्त कार्यालयात होत असते. त्यामुळे कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी नागरिकांनी आयुक्त कार्यालयात न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी नागरिकांना भेटण्यासाठी सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या तीन दिवशी दुपारी तीन ते पाच ही वेळ ठेवली होती. या वेळेत आयुक्त दरबार घेऊन नागरिकांच्या समस्या ऐकत. मात्र कोरोनामुळे हा दरबार देखील कोरोना साथ आटोक्यात येईपर्यंत रद्द करण्यात आला आहे.

एखाद्या प्रकरणात आयुक्तांची भेट घेणे अत्यावश्यक असेल तर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून पूर्वनियोजित वेळ घेऊन आयुक्तांना भेटता येईल. ज्या नागरिकांच्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी असतील त्यांनी आयुक्तांना लेखी तक्रार पाठवावी, असेही सांगण्यात आले आहे.

पोलीस पैशांची मागणी करत असतील तर….
पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस त्यांनी केलेल्या कामासाठी तक्रारदार, नागरिक यांच्याकडून पैसे मागत असतील तर त्यांचे मोबाईल संभाषण रेकॉर्ड करा. व्हाट्सअप कॉलद्वारे संभाषण होत असेल तर दुसऱ्या फोनच्या साहाय्याने संभाषण रेकॉर्ड करून पोलीस आयुक्तांना (मोबाईल क्रमांक – 9134424242) पाठवावे. पोलीस अधिकारी, अंमलदार दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. शहरातील अवैध धंद्यांबाबत देखील आयुक्तांना नागरिकांनी माहिती द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment