रविवार, जानेवारी 29, 2023

Chinchwad News : पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू, स्थायीची सभा होणार नाही, अर्थसंकल्पही लांबणीवर

एमपीसी न्यूज -चिंचवड विधानसभा मतदारसंघांमध्ये तत्काळ प्रभावाने निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासकांची स्थायी समिती, सर्वसाधारण सभा होणार(Chinchwad News) नाही. त्यामुळे विकास कामे रखडणार आहेत. महापालिकेचा 2023-24 चा अर्थसंकल्पही लांबणीवर जाईल. जनसंवाद सभेवरही परिणाम होणार आहे. नोव्हेंबर अखेर नियोजन केलेले जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटनही दीड महिने रखडणार आहे.

 

चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे 3 जानेवारी 2023 रोजी कर्करोगाने निधन झाले होते. त्यामुळे रिक्त जागेसाठी पोट निवडणूक जाहीर झाली असून मतदान 27 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या निवडणूकीचा निकाल 2 मार्च रोजी जाहीर होईल. त्यामुळे 3 मार्चपर्यंत आचारसंहिता लागू असेल. आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे महापालिकेची विकास कामे थांबणार आहेत.

महापालिकेत नगरसेवक नसल्याने प्रशासकांना स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेचे अधिकार राज्य शासनाने बहाल केले होते. त्यानुसार प्रशासकांकडून दर मंगळवारी स्थायी समिती, सर्वसाधरण सभेची बैठक घेवून कोट्यवधी रुपयांच्या खर्चाच्या विषयांना मान्यता दिली जात होती. पण, आता आचारसंहिता असल्याने स्थायी समितीची बैठक घेता येणार नाही. जनतेवर प्रभाव पडेल असे निर्णय घेता येणार नाहीत. महिन्यातून दोनवेळा होणारी जनसंवाद सभाही बंद होईल. महापालिकेचा अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्यात सादर केला जातो. 3 मार्चपर्यंत आचारसंहिता असल्याने (Chinchwad News)अर्थसंकल्पही लांबणीवर पडणार आहे.

Pimpri News : पोलीस आयुक्तालयाकडून 2022 वर्षात आलेले सर्व पासपोर्ट अर्ज वेळेपूर्वी निर्गत

उद्घाटने रखडली

जलशुद्धीकरण केंद्र आणि निघोजे बंधा-याचे काम पूर्ण झाले आहे. या दोनही प्रकल्पाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते नोव्हेंबर 2022 अखेर करण्याचे नियोजित केले होते. पण, त्यावेळी गुजरात निवडणूक असल्याने फडणवीस यांनी शहरासाठी वेळ दिला नाही. त्यामुळे उद्घाटन रखडले होते. त्याचबरोबर बहुचर्चित तारागंण प्रकल्प, निगडी प्राधिकरणातील गदिमा नाट्यगृह, शहरातील विविध चौकातील शिल्प, मोशी अग्निशमन केंद्र, इंद्रायणीनगर उद्यान व विरंगुळा केंद्राचे उद्‌घाटन आणि अमृत प्रकल्पातील एसटीपी प्रकल्पाचेही भूमिपूजन राहिले होते. आता आचारसंहिता लागल्याने दीड महिने उद्घाटन करता(Chinchwad News) येणार नाही.

 

Latest news
Related news