Chinchwad News : राजे उमाजी नाईक यांचा स्मृतिदिन साजरा

एमपीसी न्यूज – ‘राजे उमाजी नाईक हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील प्रथम आद्यक्रांतिकारक (Chinchwad News) होते. त्यांचा शुक्रवारी (दि.3) स्मृतिदिन साजरा करण्यात आला.
रामोशी-बेरड समाजाशिवाय कोणाच्याच नेहमीप्रमाणे तो लक्षात राहत नाही. त्यामुळे राजे उमाजी नाईक फक्त रामोशी-बेरड समाजापुरते सीमित राहून गेल्यासारखे होत आहे. पण सर्व जाती-धर्मांनी हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. क्रांतिकारकांचा आदर आणि त्यांचे स्मरण सर्वच जातिधर्मातील लोकांनी केले पाहिजे. मग हे राजे उमाजी नाईक असे उपेक्षित का राहून गेले हे आश्चर्य आहे. ‘मरावे परि क्रांतिरूपे उरावे’ अशी उक्ती आहे ती आद्यक्रांतीकारक राजे उमाजी नाईक यांच्याबद्दल काढली.
Nigdi news : बनावट सोने तारण ठेवत घेतले 27 लाखांचे कर्ज
चिंचवड येथील दत्ता माकर, रेखा माकर, सनी माकर तसेच; समाज बांधवानी वाल्हेकरवाडी येथे राजे उमाजी नाईक यांचा स्मृतिदिन साजरा केला. थोर क्रांतिकारांच्या आठवणींना उजाळा देत तरुणांमध्ये क्रांतिकारांविषयी ज्योत सदैव ज्वलंत राहावी, याकरिता दत्ता माकर यांनी हे पोवाडा सादर करून त्यांना (Chinchwad News) अभिवादन दिले.