Chinchwad News : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलीस बांधवांच्या घरी पोलीस आयुक्तांनी पोहोचवली दिवाळी भेट

0

एमपीसी न्यूज – कर्तव्यावर हजर असताना कोरोनाची लागण होऊन मृत्यू झालेल्या पोलीस बांधवांच्या घरी पोलीस आयुक्तांनी दिवाळीची भेट आणि शुभेच्छा पत्रे पाठवली. पोलिसांचा मृत्यू झाला असला तरी त्यांचे कुटुंब ही देखील पोलीस दलाची जबाबदारी असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले.

कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची धुरा हाती घेल्यापासून त्यांनी पोलिसांबाबत संवेदनशीलपणे कुटुंब प्रमुखाचे कर्तव्य पार पाडले आहे. दरम्यान कोरोनाची लागण होऊन शहर पोलीस दलातील तीन पोलिसांचा मृत्यू झाला. त्या कुटुंबावर संकटाची कु-हाड कोसळली. मात्र त्यातून सावरत पोलीस आयुक्तांनी त्या कुटुंबांना दिवाळीची भेट पाठवून पोलीस बांधवांचे कुटुंब देखील पिंपरी-चिंचवड पोलीस परिवाराचे सदस्य असल्याचे सांगितले.

पोलीस आयुक्तांनी तिन्ही कुटुंबियांना शुभेच्छा पत्र आणि दिवाळीची भेट पाठवून आपण शहर पोलीस दलाचा कुटुंब प्रमुख त्या कुटुंबांच्या कायम सोबत असल्याचे सांगितले. पोलीस आयुक्तांनी मांडलेल्या या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी पाठपुरावा केला.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपयुक्त सुधीर हिरेमठ, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, पोलीस अंमलदार सागर सूर्यवंशी, विष्णू उंडे, प्रीतम वाघ, कुंदन तोत्रे यांनी ही जबाबदारी पार पाडली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III