Chinchwad News : नगरसेवक शितल शिंदे यांचा सहारा वृध्दाश्रमाला मदतीचा हात

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यातील कुसवली येथील सहारा वृध्दाश्रमाला पिंपरी चिंचवड येथील भाजप नगरसेवक शीतल शिंदे यांनी मदतीचा हात दिला आहे. शिंदे यांच्यावतीने या वृध्दाश्रमाला मोबाईल टाॅयलेट देण्यात आले आहे.

आंदर मावळातील अतिदूर्गम भागातील कुसवली येथे अनाथ व निराधारांसाठी हे वृध्दाश्रम उभारण्यात आले आहे. या वृद्धाश्रमातील निराधार आणि वृद्ध नागरिकांसाठी भाजप नगरसेवक यांनी मदत करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार त्यांनी वृद्धाश्रमाच्या व्यव्स्थाकांशी संपर्क साधला. तसेच वृद्धाश्रमाची गरज लक्षात घेत अत्याधुनिक सुविधा असलेले फायबरचे शौचालय देण्याचा निर्णय घेतला.

नगरसेवक शिंदे यांनी नुकतेच नवीन अत्याधुनिक सुविधा असलेले फायबरचे शौचालय वृध्दाश्रमाकडे सुपूर्द केले.

या शौचालयामुळे चालता व फिरता न येणाऱ्या वृध्दांची मोठी गैरसोय दूर झाल्याची भावना वृध्दाश्रमाचे पदाधिकारी रामेश्वर राऊत यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.