सोमवार, डिसेंबर 5, 2022

Chinchwad News : पगाराच्या कारणावरून आंदोलन करणाऱ्या 25 माथाडी कामगारांवर गुन्हा 

एमपीसी न्यूज – पगाराच्या कारणावरून आंदोलन करणाऱ्या 25 माथाडी कामगारांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ, गुलनूर बिल्डिंग, मालधक्का, चिंचवड येथे 14 फेब्रुवारी 2022 रोजी केलेल्या आंदोलन प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

लेखापाल संजय दामोदर जोशी (वय 58, रा. शिवाजीनगर, पुणे) यांनी सोमवारी (दि.21) याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून मंगेश काटे, बाबा कांडर आणि इतर 20 ते 25 माथाडी कामगारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पगाराची सर्व रक्कम दिली नाही म्हणून 14 फेब्रुवारी 2022 रोजी चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ येथे बेकायदेशीर जमाव जमवून आंदोलन केले. आंदोलनाची पूर्व कल्पना न देता स्वत:च्या व इतरांच्या जिवाला धोका निर्माण होईल असे कृत्य केले,असे फिर्यादीत नमूद केले आहे.

लेखापाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आंदोलनकर्त्या माथाडी कामगारांवर गुन्हा दाखल केला असून, पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Latest news
Related news