Chinchwad News : नागरिकांशी उद्धट वर्तन करणाऱ्या वाहतूक पोलिसावर कारवाई करा -प्रदीप नाईक

एमपीसी न्यूज – कर्तव्यावर असताना नागरिकांशी उद्धट वर्तन करणाऱ्या वाहतूक पोलीस महिलेवर कारवाई करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी मागणी केली.

याबाबत प्रदीप नाईक यांनी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, 6 जानेवारी रोजी एल्प्रो चौकात कार्यरत असलेल्या वाहतूक पोलीस शीतल दौंडकर यांनी प्रदीप नाईक यांच्या गाडीचे फोटो घेतले. त्यामुळे नाईक दौंडकर यांच्याकडे गेले.

_MPC_DIR_MPU_II

दौंडकर यांच्याशी चर्चा करताना नाईक यांचा मास्क नाकाच्या खाली आला. त्यावरून पोलीस कर्मचारी दौंडकर यांनी उद्धटपणे वार्तालाप केला.

पोलीस सेवेत भरती होताना प्रत्येक पोलीस प्रामाणिकपणे सेवा करण्याची शपथ घेतो. परंतु, सेवेत आल्यानंतर काही पोलिसांना त्याचा विसर पडतो. ते बेजबाबदार वर्तन करतात. दौंडकर यांनीही बेजबाबदार वर्तन केले असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like