Chinchwad News : अग्रसेन ट्रस्टच्या अन्नकुट महाप्रसादाचे वाटप

एमपीसीन्यूज : श्री अग्रसेन ट्रस्ट चिंचवड़ – प्राधिकरण यांच्यावतीने दिवाळीनिमित्त अग्रवाल समाज बांधवांना अन्नकुट महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

ट्रस्टच्या वतीने दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो. या कार्यक्रमासाठी अग्रवाल समाजातील नागरिकांनी विशेष सहकार्य केले.

श्री अग्रसेन ट्रस्टचे अध्यक्ष भीमसेन अग्रवाल यांच्यासह विकास गर्ग, वेदप्रकाश गुप्ता, अनिल अग्रवाल, विनोद मित्तल, पवन गोयल, मुकेश मित्तल, विकास अग्रवाल, महेंद्र अग्रवाल आदी या वेळी उपस्थित होते.

श्री अग्रसेन ट्रस्टच्यावतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. यामध्ये अग्रवाल समाज बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग असतो.

यंदाही ट्रस्टच्यावतीने दिवाळीनिमित्त अग्रवाल समाज बांधवांना अन्नकुट महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. महाप्रसाद स्वीकारण्यासाठी समज बांधव मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.