Chinchwad News : गांधी पेठ तालीम मित्र मंडळाच्या पुरस्कारांचे वितरण

एमपीसी न्यूज- चिंचवड येथील (Chinchwad News) गांधी पेठ तालीम मित्र मंडळाच्या वतीने चिंतामणी पुरस्कार, क्रांतिवीर चापेकर पुरस्कार आणि जिजाऊ पुरस्कार या पुरस्कारांचे वितरण काल (रविवारी) करण्यात आले.

चिंचवडच्या (Chinchwad News) चापेकर स्मारक उद्यानात आमदार उमा खापरे, ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर आणि गांधी पेठ तालीम मित्र मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे जगद्गुरू तुकोबारायांचे भव्य मंदिर साकार व्हावे म्हणून कार्यरत असलेल्या हभप साहेबराव तथा बाळासाहेब काशीद यांना चिंतामणी पुरस्कार, वयाच्या साठीनंतर शंभरपेक्षा जास्त धावण्याच्या  मॅरेथॉन शर्यती जिंकणारे तसेच तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील विजेते खेळाडू हरिश्चंद्र थोरात यांना क्रांतिवीर चापेकर पुरस्कार आणि सुमारे  पन्नास वर्षांपासून चिंचवड (Chinchwad News) येथे नाममात्र दरात वैद्यकीय सेवा प्रदान करणाऱ्या डॉ. पुष्पा कलमदानी यांना जिजाऊ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी उमा खापरे यांनी, “पिंपरी – चिंचवड या औद्योगिकनगरीला सांस्कृतिकनगरी म्हणून ओळख मिळाली आहे, या गोष्टीचा खूप आनंद होतो!” अशा भावना व्यक्त केल्या.

पुरस्काराला उत्तर देताना पुरस्कारार्थींच्या वतीने बाळासाहेब काशीद यांनी, “हा पुरस्कार म्हणजे तुकोबांचा आशीर्वाद आहे!” अशी कृतज्ञता व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.