Chinchwad News : विद्यानगरमध्ये दिवाळी निमित्त भेट वस्तूंचे वाटप व मोफत वैद्यकीय तपासणी

0

एमपीसी न्यूज – जिव्हाळा ज्येष्ठ नागरिक संघ आणि श्री अग्रसेन क्लिनिक मोफत धर्मदाय दवाखाना यांच्या वतीने दिवाळीनिमित्त विद्यानगर प्रभागातील ज्येष्ठ महिलांना साडी आणि भेटवस्तूचे वाटप करण्यात आले.

जिव्हाळा ज्येष्ठ नागरिक संघाचे सल्लागार आणि माजी नगरसेवक प्रकाश धरमशी बाबर यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले आहे. तसेच यावेळी अग्रसेन क्लिनिकच्या वतीने मोफत रक्त, लघवी तपासणी करून त्यांना वैद्यकिय सल्ला देण्यात आला.

रोज दररोज 40 ते 50 नागरिक या सेवेचा लाभ घेत आहेत. या उपक्रमासाठी देविचंद किशनलाल अग्रवाल, डॅा. संतोष अग्रवाल, डॅा. शितल कुंभार (ढवळे), डॅा. निलोफर सिकिलकर, डॅा. रमेश बन्सल, प्रकाश बाबर, शहाबुद्दीन शेख, शिवाजी माने, श्रीशैल जिडगे, जयवंत थिटे यांनी परिश्रम घेतले. गरजू नागरिकांनी मोफत रक्त, लघवी तपासणी सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III