Chinchwad News: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे श्री मंगलमूर्तींची ज्येष्ठी यात्रा रद्द

0

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री मंगलमूर्तींची ज्येष्ठी यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे. शहरी भागात नियमांमध्ये शिथिलता असली. तरी ग्रामीण भागामध्ये अजूनही कोरोना संक्रमणाचे प्रमाण भरपूर आहे. त्यामुळे यात्रा रद्द करण्यात आली असल्याची माहिती चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

_MPC_DIR_MPU_II

सालाबादप्रमाणे श्री मंगलमूर्तींची ज्येष्ठी यात्रा चिंचवड ते नारंगी अशी संपन्न होत असते. या वर्षी होणारी ज्येष्ठी यात्रा दि. 13 ते 15 जून 2021 या दिवशी होणार होती. परंतु, शासनाच्या आदेशानुसार 15 जूनपर्यंत जिल्हाबंदी, संचारबंदी जमावबंदी व वाहतूक मनाई आहे. त्यामुळे ही यात्रा रद्द करण्यात आली आहे.

शहरी भागात जरी नियमांमध्ये शिथिलता केली असली. तरी ग्रामीण भागामध्ये अजूनही कोरोना संक्रमणाचे प्रमाण भरपूर आहे. त्यामुळे मंगलमूर्तींची ज्येष्ठी यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे. भाविकांनी व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन ट्रस्टने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment