-MPC-TOP-MOST-BANNER-I

Chinchwad News : ‘मालवाहतुकीसाठी पर्यावरण पूरक सीएनजी टीव्हीएस किंग कार्गो उत्तम पर्याय’

आमदार महेश लांडगे : चिंचवड एमआयडीसी येथे टीव्हीएस किंग कार्गोचा शुभारंभ

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसीन्यूज : भारतात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या सततच्या वाढत्या किंमतीतून टेन्शन घेण्यापेक्षा पर्यावरण पूरक सीएनजी टीव्हीएस किंग कार्गो उत्तम पर्याय आहे, असे प्रतिपादन भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केले.

पिंपरी-चिंचवड शहरात अद्यावत शोरूम आणि सेल्स व सर्व्हिस देणाऱ्या ‘सार्थक ऑटोच्या’ शोरूममध्ये टीव्हीएस कंपनीने मालवाहतुकीसाठी तयार केलेली ‘टीव्हीएस किंग कार्गो’ या ऑटो रिक्षाचे उद्घाटन आमदार लांडगे यांच्या हस्ते आज, शुक्रवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

चिंचवड एमआयडीसी येथील एचडीएफसी कॉलनीसमोर हा कार्यक्रम पार पडला. सार्थक ऑटोचे संचालक सुनील बर्गे, संचालक मनीषा बर्गे, हभप कैलास महाराज येवले, नगरसेविका योगिता नागरगोजे, रिक्षा संघटनेचे बाबा कांबळे, टीव्हीएसचे अधिकारी शिवानंद लामधाडे, सौरव गोराई, नितेश शेट्टी तसेच राजेश सस्ते, कपिल कुमार, रस्मी सिंग, सामाजिक कार्यकर्ते व ग्राहक कोरोनामुळे मर्यादित संख्येत उपस्थित होते.

शंकर देवरे यांनी प्रास्ताविक केले. सुनील बर्गे त्यांनी मान्यवरांचा सत्कार केला.
शिवानंद चौगुले यांनी आभार मानले.

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे आता सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांना ग्राहकांची पहिली पसंती मिळत आहे. शिवाय पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजी गाड्या जास्त मायलेज देतात. तसेच पेट्रोल – डिझेलच्या तुलनेत सीएनजीची किंमत सुद्धा कमी आहे. CNG कार्गो गाडी खरेदी करायची असल्यास टीव्हीएस कार्गो किंग मालवाहतूक रिक्षा सर्वात किफायतशीर आहे. त्यासाठी ‘सार्थक ऑटो’ला अवश्य भेट द्या. शिवानंद लामधाडे -टीव्हीएस कंपनीचे अधिकारी 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.