Chinchwad News : महिलांना रिक्षा प्रवास सुरक्षित वाटावा यासाठी प्रयत्नांची गरज : मीनल यादव

एमपीसीन्यूज : सध्या मोबाईल ॲपमुळे चारचाकी गाड्या व रिक्षाने प्रवास करणे सोपे झाले आहे. मोबाईलच्या एका क्लिकने गाडी दारात येत आहे. पण तरीही रिक्षाने प्रवास करण्यासच महिलांचा अधिक कल आहे. रिक्षातून सुरक्षित वाटावे यासाठी अधिक प्रयत्न केल्यास महिला जास्त प्रमाणात रिक्षा प्रवास करतील आणि याचा फायदा महिला प्रवाश्यांना व रिक्षाचालकांना होईल, असे मत शिवसेना नगरसेविका  मीनल यादव यांनी व्यक्त केले.

चिंचवड, मोहननगर येथे महाराष्ट्र रिक्षा पंचायतीशी संलग्न साईदत्त रिक्षा स्टॅंडचे उद्घाटन नगरसेविका मीनल यादव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. दरम्यान, 26 जानेवारीपासून मोहननगर परिसरात मीटरने रिक्षा व्यवसाय करणार असल्याची घोषणा स्टॅंडचे अध्यक्ष संतोष दौंडकर यांनी केली.

महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे, शिवसेना विभागप्रमुख विशाल यादव, सामाजिक कार्यकर्ते गणेश लंगोटे, बहुजन सम्राट सेना संस्थापक अध्यक्ष संतोष निसर्गंध, भाजपा कामगार आघाडीचे किशोर हातागळे, पंचायतचे कार्याध्यक्ष बळीराम काकडे, लक्ष्मण शेलार, विजय डंगारे पाटील, रिक्षा ब्रिगेडचे बाळासाहेब डवळे, धनंजय केंदळे आदी उपस्थित होते.

रिक्षाचालकांना आर्थिक अडचणींमधून बाहेर काढण्यासाठी रिक्षा व्यवसाय वाढवणे हा पर्याय आहे. यासाठी अनेक पातळ्यांवर उपाययोजना राबवणे गरजेचे आहे. मॉल, मोठ्या सोसायट्या, हॉटेल, हॉस्पिटल आदी ठिकाणी रिक्षा पुरवल्या पाहिजेत, तसेच मेट्रो, बीआरटी, रेल्वे, बस अशा सेवेंशी रिक्षा व्यवसाय जोडला पाहिजे, असे महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे संस्थापक बाबा कांबळे यांनी सांगितले.

कोरोनामुळे आर्थिक अडचणींमध्ये असलेल्या रिक्षाचालकांना बाहेर काढण्यासाठी सरकारने मदत करणे आवश्यक आहे. नवीन परमिटमुळे सुशिक्षित तरुण रिक्षा व्यवसायात आले आहेत, त्यामुळे पुढील काळांत रिक्षा व्यवसायांत चांगले बदल दिसतील, असे मत अनुक्रमे संतोष निसर्गंध व गणेश लंगोटे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी स्टॅंड अध्यक्ष संतोष दौंडकर, उपाध्यक्ष प्रवीण देशमाने, मयुर पटेल, गोरख भागानगरे, संपत भालेराव, दीपक सुकल, अर्जुन जानगवळी, बाबुभाई भोसले, मनोज देवरस, सुरेश पांडुळे, प्रमोद जुनवणे, अनिल कुंभार, मिलिंद मिसाळ, प्रमोद देशमाने, रघुनाथ शीलवंत, गौतम सोनवणे, दयानंद पवार, सतीश चिंचकर, ज्ञानेश्वर हराळ, अतुल मिसाळ यांनी परिश्रम घेतले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.