Chinchwad news: महामेट्रोच्या भूमिगत केबल कामातील खोदाईमुळे पाण्याची लाईन फुटली; ठेकेदारावर कारवाई करा – अश्विनी चिंचवडे

परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत

एमपीसी न्यूज – पुणे महामेट्रोतर्फे ( Pune mahametro)  भूमिगत केबल ( Underground Cable) कामासाठी रस्ते खोदाई अटी-शर्तीनुसार होत नसल्यामुळे पाणीपुरवठा लाईन फुटली ( Water Pipleline Brust)  आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे महामेट्रोच्या संबंधित विभागावर परवानगी पत्रातील अटी-शर्तीचे भंग केल्याबद्दल रीतसर कायदेशी कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना नगरसेविका अश्विनी चिंचवडे-पाटील ( Shivsena Corporator Ashwini Chinchwade) यांनी केली. तसेच अटी-शर्तीनुसार काम करून घ्यावे अशी सूचना त्यांनी केली आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हार्डीकर (Commissioner Shravan Hardikar) यांना निवेदन दिले आहे. त्यात नगरसेविका चिंचवडे यांनी म्हटले आहे की, चिंचवड पवनानगर-बिजलीनगर रस्ता येथे पुणे महामेट्रोतर्फे भूमिगत केबल कामासाठी डांबरी रोड खोदाईचे काम सुरु आहे. परंतू, हे काम करत असताना पाण्याची मोठी लाईन फुटली आहे. यामुळे पाणीपुरवठा खंडीत झाला आहे.

दिवसाआड पाणी असल्यामुळे एस.के.एफ कॉलनी, पवनानगर, मोरयानगर, वेताळनगर व शहरातील इतर भागात नागरीकांना पाणीपुरवठा महापालिकेस करता आला नाही, नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.

महामेट्रोचे काम करत असताना पाण्याची लाईन, विद्युत केबल व इतर वाहिन्यांचे नकाशे घेऊन अपघात व इतर सेवा खंडीत होणार नाही याची दक्षता घेऊन काम करणे गरजेचे होते. महामेट्रो पुणे यांनी कार्यकारी अभियंता ‘ब’ क्षेत्रीय स्थापत्य विभाग यांनी जे परवानगी पत्र दिले आहे. त्यातील अटी-शर्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळे पाण्याची लाईन फुटली आहे.

महानगरपालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकारीवर्गाचे या कामावर नियंत्रण व लक्ष नसल्याचे निदर्शनास येते. महामेट्रोच्या संबंधित विभागावर परवानगी पत्रातील अटी-शर्तीचे भंग केल्याबद्दल रीतसर कायदेशी कारवाई करावी, अशी मागणी चिंचवडे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.