Chinchwad News: शेजाऱ्याकडे गप्पा मारण्यासाठी जाणे पडले महागात; सव्वालाख रूपये किंमतीचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज – राहत्या घराला कडी लावून शेजारील घरात (Chinchwad News) गप्पा मारण्यासाठी गेलेल्या महिलेच्या घरातील बेडरूममध्ये घुसून चोरट्यांनी कपाटातील सव्वालाख रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लांबवले.  ही घटना चिंचवड – संभाजीनगर येथे सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास उघडकीस आली.

संभाजीनगर येथील कल्पक हौसिंग सोसायटीत राहणा-या महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिला दुपारी एक वाजता आपल्या घराच्या दरवाजाला कडी लावून शेजारच्या घरी गप्पा मारण्यासाठी गेली होती. अर्धा तास गप्पा मारल्यानंतर त्या घरी आल्या. यावेळी शयनगृहातील लाकडी कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने असा 1 लाख 20 हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे उघडकीस आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक कोरडे तपास (Chinchwad News) करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.