Chinchwad News : ‘अतिक्रमण कारवाईत अडथळा आणणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करा’

एमपीसीन्यूज : चिंचवड, दळवीनगर येथील महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईदरम्यान अतिक्रमण विरोधी पथकातील कर्मचारी आणि पोलिसांचा अवमान करीत कारवाईत अडथळा निर्माण करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजीत रामेशन यांनी केली आहे.

यासंदर्भात रमेशनन यांनी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना निवेदन पाठविले आहे.

दळवीनगर येथे महापालिकेच्यावतीने अतिक्रण विरोधी कारवाई करण्यात आली. यामध्ये रस्त्यावरील अतिक्रमण करून उभारलेली दुकाने हटविण्यात आली. मात्र , ही कारवाई सुरु असताना काही व्यापाऱ्यांनी कारवाईत अडथळा निर्माण केला. तसेच अतिक्रमण विरोधी पथकातील कर्मचारी आणि पोलिसांचा अवमान केला. हा प्रकार गंभीर आहे. याबाबतचे पुरावे पोलिसांना दिले आहेत.

त्यामुळे संबंधित व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत, अशी मागणी रामेशन यांनी निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.