Chinchwad News: चाकण, सांगवी, तळेगाव, चिखलीमधून पाच दुचाकी चोरीला

Chinchwad News: Five two-wheelers stolen from Chakan, Sangvi, Talegaon, Chikhali चाकण, सांगवी, तळेगाव आणि चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पाच दुचाकी चोरीला गेल्या आहेत.

एमपीसी न्यूज – चाकण, सांगवी, तळेगाव आणि चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पाच दुचाकी चोरीला गेल्या आहेत. त्याबाबत बुधवारी (दि.19) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात करण्यात आली आहे.

चाकण पोलीस ठाण्यात वाहन चोरीचे दोन गुन्हे बुधवारी दाखल करण्यात आले आहेत. त्यातील पहिल्या गुन्ह्यात अज्ञात चोरट्यांनी दुचाकी (एमएच 14 सीए 2038) चोरून नेल्याची फिर्यादी गणेश बाजीराव सप्रे (वय 23, रा. आसखेड खुर्द, ता. खेड) यांनी दिली आहे. फिर्यादी सप्रे यांची 15 हजार रुपये किमतीची दुचाकी 15 ऑगस्ट रोजी पहाटे दोन वाजता करंजविहीरे गावातील साई सिद्धी हॉटेल समोरून चोरट्यांनी चोरून नेली आहे.

दुस-या गुन्ह्यात बाळासाहेब श्रीपती पवळे (वय 32, रा. काळूल पोटवडे वस्ती, ता. खेड) यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादी पवळे यांनी त्यांची 25 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 12 बीएन 9260) 13 ऑगस्ट रोजी रात्री त्यांच्या घरासमोर रस्त्याच्या बाजूला पार्क केली होती. रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली आहे. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास चाकण पोलीस करीत आहेत.

रोहन आंणद्रेश गायकवाड (वय 25, रा. पिंपळे गुरव) यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गायकवाड यांची 40 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 14 डीयु 6060) त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमधून चोरून नेली. हा प्रकार 18 ऑगस्ट रोजी दुपारी तीन ते 19 ऑगस्ट सकाळी नऊ या कालावधीत घडला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

वाहन चोरीच्या चौथ्या प्रकरणात अनिरुद्ध बबन आंबेडकर (वय 52, रा. देवळे, मळवली, ता. मावळ) यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी आंबेडकर यांनी त्यांची 10 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 14 डीआर 2597) तळेगाव दाभाडे शहरातील जिजामाता चौकात 15 ऑगस्ट रोजी दुपारी पार्क केली होती. भरदिवसा त्यांची दुचाकी चोरून नेली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

वाहन चोरीच्या पाचव्या प्रकरणात बाळासाहेब रामभाऊ मानमोडे (वय 29, रा. कडाचीवाडी, ता. खेड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मानमोडे यांनी त्यांची 30 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 14 एचवाय 3395) ही दुचाकी 14 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता चिखली-पिंपरी रोडवरील एस के कॉम्पुटर, कुदळवाडी येथे पार्क केली होती. भर दिवसा त्यांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.