Chinchwad News – कॉसमॉस बँकेचे माजी उपाध्यक्ष अनंत दामले यांचे निधन

एमपीसी न्यूज – कॉसमॉस बँकेचे माजी उपाध्यक्ष व रोटरी क्लबचे सुवर्णमहोत्सवी (Chinchwad News) वर्षातले अध्यक्ष अनंत कृष्णाजी तथा नाना दामले यांचे वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे निधन झाले. आज पहाटे साधारण 6 वाजेच्या दरम्यान चिंचवड येथील राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

त्यांचा पत्नीने जेव्हा त्यांना पाहिले तेव्हा ते बेशुद्ध अवस्थेत होते. शेजारी राहणाऱ्या लोकांच्या मदतीने त्यांनी निरामय हॉस्पिटल येथे तात्काळ दाखल केले. परंतु, उपचारांच्या आधीच त्यांचा मृत्यू झाला होता.

सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडींमध्ये अनंत दामले यांचा भरपूर सहभाग असायचा. अनंत दामले हे रोटरी क्लबच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातले अध्यक्ष होते. ते कॉसमॉस बँकेचेही उपाध्यक्ष होते. डॉ. वसंतराव देशपांडे मेमोरियल फाऊंडेशनचे संस्थापक सदस्य होते. टेल्को कंपनीमध्ये कार्यरत असताना नाट्य क्षेत्रात त्यांचे सक्रिय योगदान होते.

Pune Fire : पुण्यातील मार्केट यार्ड येथील गोडाऊनला भिषण आग

चिंचवड येथील चित्पावन ब्राह्मण संघाचे ते संस्थापक होते. एलआयसीचे काम करत असताना एमडीआरटी या मोठ्या क्लबचे नाना दामले हे सदस्य होते. निधनाच्या अगदी आधी ते श्रीधर नगर येथील दत्त मंदिराचे अध्यक्ष होते.

अनंत दामले यांच्या पश्चात त्यांची पत्नी कीर्ती दामले आणि आशिष आणि केदार अशी दोन मुले (Chinchwad News) असून त्या दोघांच्या पत्नी आणि 3 नातवंडे असा परिवार आहे. त्यांची दोन्हीही मुले परदेशात राहत असल्याने साधारण बुधवारी पहाटे ते मायदेशी परतणार आहेत. त्यानंतर त्यांच्यावर बुधवारी 29 मार्च रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.