Chinchwad News: हॉटेल भाड्याने देते असे सांगून साडेसहा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – एका महिलेने हॉटेल भाड्याने देते, असे सांगून डिपॉझिट आणि अ‍ॅडव्हान्स म्हणून पैसे घेत हॉटेल भाड्याने न देता तरूणाची साडेसहा लाखांची फसवणूक केली. हा प्रकार वाल्हेकरवाडी येथे घडला.

सरोज आनंद गुजर (वय-39, रा. प्रगती दर्शन हौ. सोसायटी, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी संकेत बाळासाहेब थोरवे (वय-29, रा. सहयोगनगर, रूपीनगर) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने संकेत थोरवे यांना हॉटेल भाड्याने देण्याचे सांगितले.  त्यासाठी डिपॉझिट आणि अ‍ॅडव्हान्स म्हणून संकेतकडून साडेसहा लाख रूपये घेतले. हॉटेल भाड्याने न देता त्याची  फसवणूक करण्यात आली. फौजदार मोरे तपास करत आहेत.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.